ताज्याघडामोडी

आरबीआयनं २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत वाढवली नाही, आता ‘या’ नोटांचे काय होणार?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली होती, जी आता संपली आहे.

यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर होती, ती ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती. पण ७ ऑक्टोबरनंतर रिझर्व्ह बँकेने ती वाढवली नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीकडे २ हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बहुतांश लोकांनी त्यांच्या २ हजार रुपयांच्या नोटा बदलल्या आहेत, परंतु तुम्हाला तसे करता आले नसेल तर काळजी करू नका. अशा परिस्थितीसाठी आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

७ ऑक्टोबरपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन २ हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नाही, तर काळजी करू नका. ८ ऑक्टोबर २०२३ आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या २ हजार रुपयांच्या नोटांचे काय करू शकता हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे.

८ ऑक्टोबर २०२३ पासून बँकेच्या शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याचे/बदलण्याचे काम थांबले आहे.

ज्या व्यक्ती/संस्था २ हजारच्या नोटा शिल्लक आहेत, ते RBI च्या १९ इश्यू ऑफिसला भेट देऊन त्या बदलू शकतात.

RBI च्या १९ इश्यू ऑफिसमध्ये एकावेळी फक्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात.

तुम्हाला भारतातील तुमच्या बँक खात्यात २ हजार रुपयांच्या नोटा जमा करायच्या असतील तर तुम्ही RBI च्या १९ इश्यू ऑफिसमधूनही हे करू शकता. खात्यात जमा केल्यावर २० हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू होणार नाही.

भारतात उपस्थित असलेल्या व्यक्ती/संस्था देखील भारतीय पोस्टद्वारे RBI च्या १९ जारी कार्यालयांना २ हजार रुपयांच्या नोटा पाठवू शकतात. ही रक्कम त्यांच्या भारतातील बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे.

RBI/सरकारने जाहीर केलेले नियम २ हजार रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याच्या या प्रक्रियेवर लागू होतील. यासाठी आरबीआयच्या सूचनेनुसार वैध ओळखपत्रासह सर्व आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील.

RBI च्या १९ इश्यू ऑफिसमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा/बदलण्याची ही सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *