Uncategorized

पोलीस पाटील पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

दिनांक 05 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत

पंढरपूर दि. (28):- पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय 69 रिक्त पोलीस पाटील पदावर नेमणूक केली जाणार आहे, सदर जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा दि. 20 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे, संबंधित पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, या पदासाठी दि. 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष गजानन गुरव यांनी केले आहे.
पोलीस पाटील पदासाठी दिनांक 21 सप्टेंबर ते दि. 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत ( शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. तथापी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अनंत चुतर्दशीची दि. 28 सप्टेंबर 2023 रोजीची स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याने तसेच दि.29 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2023 पर्यंत सलग शासकीय सुट्टी असल्याने, अर्जदारास आवश्यक पुराव्याची कागदपत्रे विहीत मुदतीत जमा करण्यास शक्य होणार नसल्याने पंढरपूर उपविभागातील पोलीस पाटील पदासाठी इच्छुकांनी आपले अर्ज दि.05 ऑक्टोबर 2023 पर्यंत ( शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत.
मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार तसेच दि. 20 सप्‍टेंबर 2023 रोजीच्या जाहिनाम्यातील इतर कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष गजानन गुरव यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *