लातूर शहराजवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गीतांजली बनसोडे (17 वर्ष) आणि धनश्री क्षीरसागर (20 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या दोन्ही मावस बहिणींचं नाव आहे.या बहिणी हरवल्याची तक्रार दोघींच्याही आई-वडिलांनी नुकतीच पोलिसांत दिली होती. त्या नंतर पोलिसांनी या दोघींना पुण्यातून गावी आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केलं होतं. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यानंतर आज या दोघी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.
