Uncategorized

डॉक्टरने भररस्त्यात पेटवून दिली स्वतःचीच मर्सिडिज बेंझ कार 

धर्मपुरीच्या डॉक्टरला प्रेयसीचा विरह सोसवेना

तमिळनाडूच्या कांचीपुरममध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. लाँग ड्राईव्हवर निघालेल्या प्रियकर प्रेयसीचा वाद झाला. त्यानंतर २८ वर्षांच्या डॉक्टर प्रियकरानं रस्त्यात अचानक मर्सिडिज बेंझ कार थांबवली आणि ती पेटवून दिली. कार जळू लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. एका बाजूला कार पेटत असताना दुसऱ्या बाजूला प्रियकर प्रेयसीमधील वादही पेटत होता. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना पोलीस ठाण्यात नेलं. यानंतर डॉक्टरची जामिनावर सुटका करण्यात आली.

धर्मपुरीत वास्तव्यास असलेल्या २८ वर्षांच्या कविननं गेल्याच वर्षी कांचीपुरमच्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. डॉक्टर झाल्यानंतर त्यानं एका खासगी रुग्णालयात काम सुरू केलं. त्याच महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीशी दोन वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविन आणि त्याची प्रेयसी कांचीपुरमसह आसपासच्या परिसरात फिरण्यासाठी कारनं निघाले होते. राजाकुलम गावाजवळ असलेल्या तलावाजवळ कविननं कार थांबवली.

लाँग ड्राईव्हला निघालेल्या कविन आणि त्याच्या प्रेयसीचं भांडण झालं. वाद वाढत गेला. त्यावेळी कविननं कारमधून एक रिकामी बाटली काढली. कारमधून पेट्रोल काढत ते बाटलीत भरलं. त्यानंतर तेच पेट्रोल कारवर उडवलं आणि त्यानंतर कार पेटवून दिली. दरम्यान कविनच्या प्रेयसीनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात असलेला कविन थांबला नाही. पादचाऱ्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. तासाभरात त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र कार संपूर्णपणे जळून खाक झाली. या प्रकरणी कांचीपुरम पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मात्र कविन जामिनावर सुटला.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *