ताज्याघडामोडी

हळदीच्या दिवशी ‘नवरी’ प्रियकरासह पळाली, फिनेल पिऊन पोलिसात गेली, विदर्भात खळबळ

लग्नाच्या आदल्या दिवशी घरात हळदीचा समारंभ सुरु होता. मात्र याच वेळी नवरीने टोकाचं पाऊल उचललं. प्रियकरासोबत फिनेल पिऊन तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. आपलं वय अवघ्या १६ वर्षांचं असून आई-वडील माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत आहेत, असं तिने पोलिसांना सांगितलं. बुलढाण्यात ही घटना घडल्याची माहिती आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे लग्नाच्या एक दिवस आधी हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर १६ वर्षीय उपवर मुलगी घरुन निघाली. प्रियकरासह फिनेल पिऊन तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. वय कमी असतानाही आपले आई वडील इच्छेविरुद्ध लग्न लावून देत असल्याचे तिने सांगितले. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव शहरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे याच परिसरातील १८ वर्षीय मुलावर प्रेम आहे. हे प्रेम प्रकरण माहित पडल्याने मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रत्नागिरी येथील एका मुलाशी तिचे लग्न ठरविले. लग्नाची तारीख ठरली. पत्रिका देखील वाटप झाल्या. काल ८ मार्च रोजी सदर मुलीला हळद लागली. नातेवाईकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात हळदीचा कार्यक्रम पार पडला.

मुलीच्या घरी आजच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर उपवर मुलीने घर सोडून प्रियकराची भेट घेतली. त्या दोघांनी फिनेल प्राशन करुन थेट शहर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी लगेच मुला-मुलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *