ताज्याघडामोडी

देशभरातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलले, पाहा संपूर्ण यादी; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. याशिवाय राष्ट्रपतींनी १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली आहे. झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांच्याकडे आसामची, माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रपतींकडून नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपाल आणि उपराज्यपालांची संपूर्ण यादी

१. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

२. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम

३. सी. पी. राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड

४. शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

५. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम

६. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

७. बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ

८. अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर

९. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड

१०. फागू चौहान, राज्यपाल, मेघालय

११. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

१२. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

१३. निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *