ताज्याघडामोडी

बार्शीचे भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश

बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याच्या तक्रारी  

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.मार्च २०२१ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने उच्च न्यायलयात धाव घेतल्याचं आंधळकर यांनी सांगितलं.

उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोलापूरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्याकडे किती केसेस पेंडिंग आहेत यासंदर्भात माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात असलेल्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या जवळ असलेल्या पेंडिंग केसेसची माहिती सादर केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आमदार राजेंद्र राऊत यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आंधळकर यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर. एन. लड्डा यांनी हे आदेश दिले आहेत.

आमदार राजेंद्र राऊत यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे,”माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन १४ मार्च २०२१ रोजी जवळपास १७ यंत्रणांकडे तक्रार केली होती, अशी माहिती आंधळकर यांनी दिली. ईडी, आयकर विभाग आणि लाचलुचपत विभागाकडे देखील तक्रार दिली होती. त्यासाठी विवरणाची प्रतिज्ञापत्रे, मालमत्तेचे उतारे, वाहने यांची छायाचित्रे सादर करून वाढलेल्या स्थावर जंगम मालमत्तेचा तक्ता देखील आंधळकर यांनी सादर केला होता.

ईडी,आयकर विभाग व अँटी करप्शन या विभागाकडून कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने भाऊसाहेब आंधळंकर यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीवर नाराजी व्यक्त करत तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *