सर्व गोष्टीचा उलगडा करणार असल्याची दिली माहिती
यासंबंधी सत्यजीत तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने वेळेवर एबी फॉर्म न पाठविल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ही वस्तुस्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काल जे वक्तव्य केले ते अर्धवट आहे. वेळ आल्यानंतर मी या सर्व गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होतील,’ असेही तांबे म्हणाले.
नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना नाशिकमध्ये बोलताना एक वक्तव्य केले होते. निर्णय झाला आणि वेळ पडली तर भाजप एका रात्रीतून वातावरण फिरवू शकतो, असे विखे म्हणाले होते. यासंबंधी विचारले असता तांबे म्हणाले, ‘मी असे वक्तव्य ऐकलेले नाही. त्यामुळे यावर मी बोलू शकत नाही. भाजपने पाठिंबा दिल्याचा मला कोणताही संदेश आलेला नाही. मला कुणीही भेटलेले नाही, माझ्या कुणीही संपर्कात नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही.’ असेही तांबे यांनी स्पष्ट केले.
भाजपाने पाठिंबा दिला तर तुम्ही घेणार का? यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळत ‘या संदर्भात माध्यमांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारावे,’ असे तांबे म्हणाले. पुढे चालून काँग्रेसने निलंबनाची कारवाई मागे घेतली तर आपण काँग्रेस बरोबर जाणार का? असे विचारले असता तांबे म्हणाले की, ‘मी जर तरच्या प्रश्नावर वक्तव्य करणार नाही.’
Republic Day Offer
️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट* बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995