ताज्याघडामोडी

एकाच वेळी 2 भावांची एकत्र निघाली अंत्ययात्रा, अख्खं गाव रडलं

लहान भावाच्या मृत्यूनंतर घरी पोहोचलेल्या मोठ्या भावाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांत दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने घरातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन्ही भावांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दुर्दैवी घटना राजस्थानातील बाडमेरमध्ये घडली. बाडमेरच्या सिंधरी शहरातील होडू गावात दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होडू गावातील ‘सारणों का तला’ इथं राहणारा 26 वर्षीय सुमेर सिंह गुजरातमधील सुरत येथे काम करायचा.

मंगळवारी पाय घसरल्याने तो छतावरून खाली पडला आणि उपचारांदरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी घरी आणण्यात आले. लहान भावाच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ सोहन याला गावी बोलवण्यात आलं.

बुधवारी सकाळी सोहन सिंह घरापासून काही अंतरावर असलेल्या टाकीतून पाण्याची बादली भरत असताना अचानक टाकीत पडून त्याचा मृत्यू झाला.

28 वर्षांचा सोहन सिंग जयपूरमध्ये शिकत होता आणि सरकारी नोकरीची तयारी करत होता. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगत त्याला घरी बोलावण्यात आलं होतं, पण त्याचाच दुर्दैवी मृत्यू झाला. बराच वेळ सोहन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी टाकीजवळ जाऊन पाहिलं असता त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. कुटुंबीयांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि मृतदेह बाहेर काढून पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला.

गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावांमध्ये चांगले संबंध होते. सोहन सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर सिंह अभ्यासात फार हुशार नव्हता. मोठा भाऊ सोहनच्या शिक्षणाचा खर्च धाकटा भाऊ सुमेर करत होता.

सिणधरीचे पोलीस अधिकारी सुरेंद्रसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भावाचा मृत्यू सूरतमध्ये छतावरून खाली पडल्याने झाला, तर दुसऱ्या भावाचा मृत्यदेह पाण्याच्या टाकीमध्ये सापडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *