ताज्याघडामोडी

महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस; संतापून म्हणाल्या,”जी नंगानाच करत फिरतेय, तिला.”

मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून चित्रा वाघ यांना उत्तर दिले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला मारहाण करण्याचा धमकीवजा इशाराही दिला होता. यावर उर्फीनेही ट्वीट करतही चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते. यात महिला आयोगाचीही एंट्री झाली.

दरम्यान, या सर्व प्रकरणामध्ये महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. दोन समुदायात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि महिला आयोगाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत महिला आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महिला आयोगाला प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय, याचं आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीस पाठवण्याचा, तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर पडलीय. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरत आहे, तिला नोटीस द्यायला हवी. तर तिला नोटीस न देता. हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला नोटीस पाठवली आहे. असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार.”असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *