ताज्याघडामोडी

प्रियकराच्या मदतीने पतीचं अपहरण

विवाहितेचे नवऱ्यासोबत भयंकर कृत्य

प्रियकराच्या साथीने पतीचं अपहरण करुन विवाहितेने त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील मालेगाव रोड परिसरात मारहाणीचा प्रकार घडला. मुलाच्या ताब्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद झडत असत. यावरुनच महिलेने प्रियकर आणि अन्य तिघांच्या मदतीने पतीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या पत्नीसह इतर तीन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गीतांजली हाके, बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार, अवतारसिंघ रामगडीया, अमोल भुक्तरे अशी या पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

अपहरण करुन सौरभ बार मालेगाव रोड परिसरात नेऊन श्रीरामे यांना जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी पत्नी गीतांजली हाके, बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार, अवतारसिंघ रामगडीया, अमोल भुक्तरे यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनेच्या काही तासातच सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *