ताज्याघडामोडी

विद्यार्थिनीचा लग्नास नकार, तरुणाचा तरुणीसह स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी प्रयोगशाळेत असताना विद्यार्थी दुचाकीवर आला. त्याने ती प्रयोगशाळेत तिच्या मार्गदर्शक महिला प्राध्यापकांशी संवाद साधत असताना त्याने सोबत आणलेले रॉकेल तिच्या अंगावर टाकले. या भीतीने प्राध्यापक व ती मुलगी बाहेर पळत आली. त्याने तिला पेटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तिचा चेहरा जळाला असून मुलगाही भाजला आहे.

शासकीय विज्ञान संस्था येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीच्या अंगावर व स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. मुलाचे नाव गजानन मुंडे असे आहे. जळालेल्या अवस्थेत असलेल्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर मुलीने लग्नास नकार दिला या कारणावरून गजानन मुंडे यांनी पूजा साळवे हिच्या सोबत स्वतःला आग लावून घेतली अशी माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा जबाब नोंदवणे सुरू असून तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुलगी ही बायो फिजिक्स अभ्यासक्रमाची विज्ञान संस्थेतील माझी विद्यार्थीनी आहे. या घटनेमुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. संबंधित विद्यार्थ्यांनीवर प्रेम प्रकरणातून हल्ला केला की तर इतर काही कारण आहे. याबाबत पोलिस तपास घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *