करुणा शर्मांच्या मुंबईतल्या घरी बीड पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. करुणा शर्मांच्या मुंबईतल्या सांताक्रूझ येथल्या घरी पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. करुणा शर्मा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल गाड्या स्थानकात उभ्या आहेत तर काही गाड्या या स्थानकांदरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन प्रवास करत आहेत. याचदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे नाल्यावरुन जात असताना चार महिन्यांचं बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून […]
वडिलांचा अपघात झाला आहे असं सांगून अल्पवयीन मुलीला १९ वर्षीय तरुण घेऊन गेला. यानंतर त्याने रस्त्यात एका बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या या आरोपी तरुणाला अकोल्याचे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने दोषी ठवरलं. अल्पवयीन पीडितेच्या लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याला आजन्म कारावासाची […]
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस होत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात […]