ताज्याघडामोडी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गादेगांवातील युवकांनी वाचवले मोराचे प्राण

गादेगांव-वाखरी रोड वरील हुंडेकरी वस्ती जवळ रस्ता ओलांडत असताना मोराला वाहनाची धडक बसल्याने तो जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडला होता.

जखमी अवस्थेतील मोराला बघून गावातील युवकांनी गणेश बागल यांच्याशी संपर्क साधला असता गणेश बागल व वृक्षमित्र दत्ता बागल यांनी तात्कळ वनविभागाचे कर्मचारी शकील मणेरी यांच्या संपर्क साधला व ताबडतोब मोराला प्राथमिक उपचार गादेगांव मधील पशुवैद्यकीय दवाखान्यात डाॅ. प्रविण खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर मोराला पुढील उपचाराकरता कासेगांव मधील नव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी चैत्रली वाघ व वनपाल सुनिता पत्की यांच्या स्वाधीन करण्यात आले. यापूर्वी ही गणेश बागल व दत्ता बागल यांनी अनेक मोरांचे प्राण वाचविले आहेत.

यावेळी मा.ग्रा.सदस्य गणेश बागल, वृक्षमित्र बिल्डर दत्ता बागल, कृषिमित्र गणपत बागल, मनसेचे अनिल बागल, वनरक्षक शकिल मणेरी, वनपाल सचिन कांबळे, डाॅ.प्रविण खंडागळे, अनिल हुंडेकरी, सचिन हुंडेकरी, विठ्ठल भोसले, प्रशांत पाटील, आबा हुंडेकरी, जयदीप पंडित, मधुकर बागल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *