ताज्याघडामोडी

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदावरून गजानन गुरव यांना हटवले

कार्यपध्दतीबद्दल होती कमालीची नाराजी

नगर पालिकेच्या प्रशासक पदावरून देखील हटवा – श्रीकांत शिंदे

 

पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले यांची कारकीर्द कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय ठरली.सर्वसामान्य जनतेने रात्री अपरात्री जरी फोन कॉल केला तरी त्यास प्रतिसाद देण्याची तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले यांची कार्यपद्धती या शहर तालुक्यातील जनतेस भावली आणि याचीच परिणीती म्हणून सचिन ढोले हे कमालीचे लोकप्रिय ठरले.मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून विठ्ठल जोशी यांनी कार्यकाळ सांभाळण्या पूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार होता आणि त्यांनी हि जबाबदारी देखील अतिशय लोकाभिमुख कारभार करीत पार पाडली होती.मात्र पुढे श्री ढोले यांची पुरवठा विभागाच्या सह आयुक्तपदी बढती झाली आणि बदलीही झाली.आणि पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून गजानन गुरव आले.याच वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची बदली झाल्याने समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सोपविण्यात आला.तर मागील वर्षी २८ डिसेंबर रोजी पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने गजानन गुरव हेच प्रशासक म्हणून रुजू झाले.आणि या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना गजानन गुरव यांची कार्यपद्धती सतत वादग्रस्त ठरत आली.महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या कार्यपद्धती विरोधात थेट मंत्रालय पातळीवर तक्रारी दाखल करण्यात आल्या.

    तर नुकतेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभा मंडपात थेट नामजप कार्यक्रमास प्रतिबंध करून गजानन गुरव यांनी आपली ‘कर्तव्य दक्षता’ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला खरा पण वारकरी सांप्रदाय आणि विविध पक्ष संघटना यांनी आधीच आपल्या आपल्या कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रांताधिकारी गुरव यांच्या विरोधात रणशिंग फुंगले.वरिष्ठ पातळवीर तक्रारी दाखल केल्या आणि याचीच परिणीती म्हणून गजानन गुरव यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या भजन,कीर्तन,नामजप आदी बाबतच्या निर्णयास बगल द्यावी लागली.मात्र त्यांच्या कार्यपद्धती बाबतची नाराजी काही कमी होऊ शकली नाही. 
        आता आज २८ सप्टेंबर रोजी गजानन गुरव यांच्याकडील मंदिर समीतीच्या कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार राज्य शासनाने काढून घेतला असल्याचे पत्र वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण वीर महाराज यांनी सोशल मीडियावर टाकताच त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत असून  शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांबाबत विविध पक्ष संघटनांनी नाराजी व्यक्त करूनही दखल घेतली नाही या सबबी खाली पंढरपूर नगर पालिकेच्या प्रशसकपदाची जबाबदारी देखील शासनाने काढून घेत सर्वसामान्य जनतेशी कनेक्टिव्हीटी असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे सोपवत पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्यावरील ‘भार’ कमी करावा अशी मागणी  राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केली असून महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात आपण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अरण ता.माढा येथे कार्यक्रमासाठी आले असताना निवेदनाद्वारे सदर मागणी केली होती  याची आठवण देखील श्रीकांत शिंदे यांनी करून दिली.        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *