ताज्याघडामोडी

तरटगाव येथील अवैध वाळू उपशावर कारवाई

वाळूसह वाहन घेतले ताब्यात,पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई 

पंढरपूर तालुक्यातील तरटगाव येथे अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत एक विना नंबरचा छोटा हत्ती टेम्पो अर्धाब्रास वाळूसह ताब्यात घेतला.या प्रकरणी अज्ञात चालका विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     या बाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास हजारे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी १५ वाजनेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी केलेल्या सुचनेनुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी कर्मचारी हे तरटगाव येथे हनुमान मंदिरासमोर गेले असता त्यांना एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो येत असल्याचे दिसून आले.टेम्पो चालकाने पोलीस आल्याचे पाहताच छोटा हत्ती वाहन जागीच सोडून उसाच्या पिकात पळ काढला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *