एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी “इनोव्हेशन इन डायब्रीड अँड इलेक्ट्रीक व्हेईकल” या विषयावर इंजिनिअर सोमनाथ पिसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
या व्याख्यानाच्या सुरुवातीस मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी व्याख्याते इंजिनिअर सोमनाथ पिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हे व्याख्यान मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंजिनिअर सोमनाथ पिसे यांनी काॅन्फीगरेशन ऑफ बॅटरीज, डी. सी. मोटार सिस्टीम यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दत्तात्रय तांबवे, अकुंश आवताडे सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय गिराम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सोमनाथ कोळी यांनी मानले.
