ताज्याघडामोडी

मोबाईलवर गेम खेळण्यावरून भावासोबत झाला वाद, बहिणीने घेतला गळफास

मुलं मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारी पालक करतात. रात्रंदिवस मोबाईल गेम खेळणारी मुले आजारी पडत असून त्यांच्या वागण्यातून चिडचिडेपणा दिसून येत आहे.

हेच मोबाईलचे व्यसन आता जीवघेणे देखील ठरत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोबाईल गेम खेळण्यावरून भावंडांमध्ये झालेल्या भांडणात 10 वर्षांच्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शहरातील मोहल्ला सिव्हिल लाईन येथे राहणारे पुरण वर्मा यांची 10 वर्षांची मुलगी मोबाईलवर गेम खेळत होती. यावेळी मुलीचा मोठा भाऊ तेथे आला, त्यानेच गेम खेळण्यासाठी मोबाईल हिसकावून घेण्यास सुरुवात केली. यावरून भावा-बहिणीत भांडण झाले. अखेर भावाने बहिणीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो गेम खेळण्यात मग्न झाला.

हे सहन न झाल्याने बहिणीने रागाच्या भरात खोलीत जाऊन आईच्या साडीला गळफास लावून गळफास लावून घेतला, यात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, किचनमध्ये जेवण बनवत असलेली मोठी बहीण खोलीत पोहोचली आणि बहिणीला लटकताना पाहून तिने सर्वांना याबद्दल माहिती दिली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोस्टमॉर्टमच्या भीतीने कुटुंबीयांनी घाईघाईने मुलीवर अंतिम संस्कार केले.

मुलीच्या मोठ्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, घटना घडण्याच्या वेळी आई बाजारात गेली होती आणि वडील ड्रायव्हर असल्यामुळे तेही घराबाहेर होते. घटनेनंतर आई आणि वडील दोघेही घरी पोहोचले होते. पाच भावंडांमध्ये मृत बहीण सर्वात लहान होती. या प्रकरणाचा आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *