ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे  युवा सेनेची मागणी

पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे 

युवा सेनेची मागणी,निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा 
कोरोनामुळे अनेक छोटे मोठे व्यवसायिक अडचणीत आले आहेत त्या प्रमाणेच अनेक दिव्यांग देखील प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या दिव्यांगांना शासनाकडून ५ टक्के सहाय्यता निधी नगर पालिकेच्या माध्यमातून वितरित केला जातो.नोव्हेंबर महिन्यात या निधीचे वाटप होत असते व जिल्ह्यातील इतर तालुक्यात या निधीचे वाटप करण्यात आले असताना पंढरपूर नगर पालिकेकडून मात्र अजूनही निधी वितरित करण्यात आलेला नाही.सदर निधीचे तातडीने वाटप करण्यात यावे अन्यथा नगर पालिकेच्या दारात दिव्यांगांना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा युवा सेनेचे शहर उपाधिकारी चेतन नेहतराव यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *