युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भटुंबरे येथे भव्य हाप पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे आले होते. रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी आयोजित या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम बक्षीस 15 हजार रुपयाचे गणेश कोताळकर यांनी,व्दितीय बक्षीस ११ हजार रुपये संजय ननवरे यांनी तृतीय बक्षीस 7 हजार रुपये प्रणव परिचारक युवामंच यांच्यावतीने देण्यात आल्याची माहिती आयोजक बबलू प्रक्षाळे साजन माने यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार मारणाऱ्यांना 1 हजाराचे बक्षीस शरद पावसकर यांच्या वतीने तर सलग 3 चौकार मारणार यांना एक हजाराचे बक्षीस मारुती तावसकर यांनी दिले तर सलग विकेट घेणाऱ्यानाही एक हजाराचे बक्षीस विकास पवार यांच्या वतीने देण्यात आले.