ताज्याघडामोडी

“कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला.”; सचिन वाझेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खोचक विधान

अँटिलिया स्फोटकं प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत. त्या प्रकरणापासून सुरू झालेल्या घडामोडी, खळबळजनक खुलासे यामुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही राजीनामा देऊन गजाआड जावं लागलं.याच सचिन वाझेबद्दल आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक विधान केलं आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “आधी काही गैरप्रकार झाला की इथे बोफोर्स झाला असं म्हटलं जायचं. अगदी खेडेगावात जरी काही झालं तरी बोफोर्स झालं म्हणायचे. आता असं म्हणतात की, याचा सचिन वाझे झाला. हा सचिन वाझे आहे. कुठुन दुर्दशा आठवली आणि त्याला सर्विसमधे घेतलं. अर्थात कायदा आपलं काम करतोय. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होतं. ते होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि चांगलं काम करा.

पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालय येथे चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यावेळी अजित पवार त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की, माझा स्वतःचा फोन नंबर. एका बहाद्दर पठ्ठ्याने असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं की माझ्याच मोबाईल नंबरवरून फोन केल्याच वाटलं आणि वीस लाख रुपये मागितले. पण माझ्या नंबरवरून फोन केला की कॉलर आयडीमुळे फोन नंबर येत नाही हे ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीला माहित होतं. चौबे का कोणाचे नाव घेतले. आता याने केला होता की आणखी कोणी केला होता काय माहित?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *