गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाईल फुटल्याची भीती, वडिलांच्या नावे सुसाईड नोट, दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अभ्यासाच्या तणावातून नाही, तर मोबाईल फुटल्याच्या कारणावरुन तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस हद्दीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मोबाईल फुटल्याच्या भीतीपोटी 19 वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवलं. विद्यार्थिनीने राहत्या घरातच गळफास घेऊन आपल्या जीवनाची अखेर केली.

पप्पा, माझा मोबाईल तुटला होता, मला माफ करा, असे सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलेले शब्द अनेकांच्या काळजाला घरं पाडत आहेत. आत्महत्येबाबत भाडेकरुंनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

काय आहे प्रकरण?

मोबाईल फुटल्याच्या भीतीपोटी दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातून समोर आली आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी विद्यार्थिनीने वडिलांच्या नावे एक सुसाईड नोटही लिहिली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय पूजा ही मूळची बिहारची आहे. मात्र ती गाझियाबादमध्ये आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होती. पूजाचे वडील ई-रिक्षा चालवतात.

नेमकं काय घडलं?

पूजा ही दहावीची विद्यार्थिनी होती. पूजाची आई आणि मोठी बहीण काही कामानिमित्त बिहारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तर तिचे वडीलही बाहेर गेल्यामुळे घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती. तिने दुपारच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये काय?

पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘पप्पा, माझा मोबाईल तुटला आहे, मला माफ करा’ असे लिहिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *