

थंडीचा कडाका वाढत असल्याने रात्रीचे १० वाजले नाहीत तो पर्यत गावात सामसूम होत असल्याचा फायदा उचलत चोरटयांनी आपली करामत दाखविण्यास सुरवात केली असून पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरातील ६ दुकानाचे शटर उचकटून चोरी करत हजारो रुपयांची रोकड व मुद्देमाल लंपास केला आहे.
या बाबत रेवणसिद्ध आप्पाराव वाघ वय. 45वर्षे, धंदा.किराणा दुकान, राहणार.रोपळे,ता. पंढरपर यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्री समर्थ किराणा ,सह्याद्री गिफ्ट आर्ट,पांडुरंग कदम यांचे झेरक्स दुकान,विश्वंभर भोसले यांचे पान शॉप,नितीन आदमिले यांचे कृषीकेंद्र,शंकर किसन कदम यांचा दोन भार चांदीचा गणपती, राजुरकर यांचे गुरुकृपा ज्वेलर्स,नामदेव घोरपडे यांचे आदिती मेडीकल व धनश्री मल्टिस्टेट सोसायटी यांचे शटर उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.