गुन्हे विश्व

पंढरपूर दुय्यम निबंधक क्रमांक २ सहित ५ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल

तलाठी,मंडल अधिकारी यांनी यांच्याशी संगनमत करून नोंद धरल्याचा आरोप

पंढरपूर तालुक्यातील शेवते ता.पंढरपुर येथील जमीन गट क्रंमाक 485/2 क्षेत्र 00.81 आर. पैकी पुर्व बाजूची 00.41 आर. इतक्या क्षेत्राचे व फिर्यादीचा मयत भाऊ मोहन रामचंद्र शेजाळ यांना जमिन गट क्रं.484/2 क्षेत्र 00.81 आर. पैकी पुर्व बाजूची 00.40 आर. इतक्या क्षेत्राची दि.08/11/2002 रोजी रजिस्टर साठेखत, कब्जे पावती, मृत्युपत्र, कुलमुखत्यारपत्र लिहून, नोंदवून दिलेले आहे. तेव्हांपासून वरील मिळकती फिर्यादी हा वहिवाटून उत्पन्न घेत आला असताना लक्ष्मण महादू जाधव हे दिनांक 28/09/2017 रोजी मयत झालेले आहेत अशी वस्तुस्थिती असताना लक्ष्मण महादू जाधव यांच्या नावाची बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून व ते जिवंत आहेत असे भासवून त्यांचे जागी तोतया व्यक्ती उभा करून व तोच लक्ष्मण महादू जाधव आहे असे भासवून व दाखवून मौजे शेवते तालुका पंढरपूर येथील गट क्रं.484/2 क्षेत्र 00 हे .81 आर. यापैकी पुर्व बाजूची 00.41 आर.व गट क्रंमाक 485/2 क्षेत्र 00 हे .81 आर. पैकी पुर्व बाजूची 00.40 आर. या मिळकतीचे खरेदीखत नावाचा बनावट, खोटा दस्त अस्तीत्वात आणला व बनावट खोटया दस्तावर मयत लक्ष्मण महादू जाधव यांच्या खोटे बनावट अंगठे व खोटे बनावट घोषणापत्र तयार केले अशी फिर्याद फिर्यादी – वसंत रामचंद्र शेजाळ वय 61 वर्षे, धंदा-शेती, राहणार- शेवते ता.पंढरपूर यांनी मा. फौजदारी न्यायालय कोर्ट नं. 3 पंढरपुर यांचे कोर्टात दाखल केली होती.व योग्य त्या चौकशीचे आदेश व्हावेत अशी विनंती केली होती.
मा. फौजदारी न्यायालय कोर्ट नं. 3 पंढरपुर यांचे कडील जा.क्रं. 2522/2021 दिनांक 25/11/2021 सी.आर.आय. एम.ए. नं. 775/2021 अनन्वे फौ.प्र.सं. कलम 156 (3) प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून 1) चंद्रकांत सदाशिव काळे वय 44 वर्षे, धंदा-शेती, रा.वाडीकुरोली,ता.पंढरपूर 2) नागनाथ अभिमान काळे वय 33 वर्षे, धंदा-शेती, रा.वाडीकुरोली,ता.पंढरपूर3) विठ्ठल आण्णासो काळे वय 25 वर्षे, धंदा-शेती, रा.वाडीकुरोली,ता.पंढरपूर4) बाँड रायटर एन.व्ही.साळुंखे वय 45 वर्षे धंदा दस्तलेखनिक रा. पंढरपूर तहसिल कार्यालय आवार पंढरपूर 5) दि. 31/05/2019 रोजी पदावर असलेले तत्कालीन दुय्यम निबंधक अधिक्षक,पंढरपूर -2 रा. दुय्यम निबंधक कार्यालय या आरोपी क्रं.1 ते 5 यांनी जाणून बुजुन कटकारस्थान तयार करून आर्थिक देवाण घेवाण व आर्थिक लोभापोटी फिर्यादीच्या ताब्यात असणारी मिळकत हस्तगत, आबळस करण्याच्या हेतूने जाणून बुजून खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून व त्या आधारे आरोपी क्रं. 1 च्या नावे खोटा,बनावट दस्त दुय्यम निबंधक कार्यालय पंढरपूर 2 यांच्या कार्यालयात दिनांक 31/05/2019 रोजी आरोपींनी नोंदविलेला आहे व वरिल खोटया व बनावट दस्ताच्या आधारे आरोपी नं. 1 याने महसूल अधिकारी गांवकामगार तलाठी, मंडल अधिकारी यांच्याशी संगनमत करून त्यांच्या नावाची नोंद 7/12 पत्रकी करून घेतलेली आहे अशा आशयाची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *