ताज्याघडामोडी

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज 18 नोव्हेंबरपासून ते 9 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.  या मुदतीनंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10 वीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना नियमित शुल्कासह पहिल्यांदात परीक्षेला बसणारे विद्यार्थी 9 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करु शकतात. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 20 ते 28 डिसेंबरपर्यंत आहे.

पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि काही विषय घेऊन परीक्षा देणारे, आयटीआय संस्थेद्वारे परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी 10 ते 20 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी शाळांमार्फत मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर परीक्षा अर्ज पाठवायचे आहेत, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केल्या आहेत. वर्ष 2022 मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020 तर 2021 तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा अर्ज करता येणार आहे.

p

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *