गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, विशेष न्यायाधीश निलंबित

अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका विशेष न्यायाधीशाचं निलंबन करण्यात आलं आहे. या न्यायाधीशासह अन्य दोन कर्मचारीही निलंबित झाले आहेत.

ही घटना जोधपूरमधील आहे.

जितेंद्र गुलिया असं या न्यायाधीशाचं नाव असून तो दंडाधिकारी म्हणून काम करतो. पीडित मुलगा हा 14 वर्षांचा असून तो मथुरा गेट परिसरात राहतो. टेनिसपटू असलेला पीडित हा जोधपूरमधील एका क्लबमध्ये टेनिस खेळायला जातो. त्या क्लबमध्ये गुलिया देखील येत होता.

गुलियाने पीडित मुलाशी ओळख वाढवली आणि मग तो त्याला आपल्या घरी घेऊन जाऊ लागला. एक दिवस गुलियाने या मुलाला आपल्या घरी नेल्यानंतर कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं. जेव्हा मुलगा बेशुद्ध पडला तेव्हा त्याच्यावर गुलियाने लैंगिक अत्याचार केले. त्याचा एक व्हिडीओ देखील बनवला. हा व्हिडीओ त्याच्या मित्रांना दाखवून बदनाम करण्याची धमकी दिली. पीडित मुलाच्या मोठ्या भावाला तरुंगात पाठवण्याची आणि आईवर बलात्कार करण्याची धमकी देखील गुलियाने दिली.

हा प्रकार सुमारे दीड महिना सुरू राहिला. गुलिया याचे दोन सहकारी अंशुल सोनी आणि राहुल कटारा यांनी देखील पीडित मुलावर अत्याचार केले. पीडित मुलगा भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचं त्याच्या आईने ताडलं. त्यानंतर एक दिवस गुलिया स्वतः या मुलाला घरी सोडायला आला तेव्हा त्याच्या देहबोलीवरून आईला संशय आला.

आईने मुलाला याबाबत विचारणा केली तेव्हा मुलाने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर सोनी आणि कटारा यांनी काही पोलिसांसमवेत येऊन मुलाच्या आईला धमक्याही दिल्या. त्या धमक्यांना बळी न पडता मुलाच्या आईने या प्रकरणी पुढील कारवाई करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलिया आणि त्याचे दोन सहकारी माफी मागायला मुलाच्या घरी आले आणि त्यांनी असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, अशी ग्वाही दिली.

पण, मुलाच्या कुटुंबाने या माफीचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल केला. त्यानंतर या व्हिडीओवरून पोलिसात तक्रार दाखल झाली. या प्रकरणी गुलिया याला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच त्याचे सहकारी सोनी आणि कटारा यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *