गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्होळे येथून अवैध वाळू उपसा करून मोडनिंबकडे निघालेला टिपर करकंब पोलिसांनी घेतला ताब्यात

मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घातल्याने पोलीस शिपाई गणेश सोनलकर यांचा दोनच दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता.

त्यानंतर आता जिल्ह्यात वाळू चोरी करणारे महाभाग काही काळ तरी शांतता बाळगतील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच कितीही गंभीर घटना घडल्यातरी वाळू चोरी करणारे मात्र मागे हटत नसल्याचेच चित्र पुन्हा दिसू लागले आहे.पंढरपूर तालुक्यातील व्होळे परिसरातील भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करून जाधववाडी रस्त्यावरून  मोडनिंबकडे निघालेल्या टिपरला करकंब पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी कौठाळी येथील अरविंद भिमराव अटकळे व सोमनाथ अरूण लोंढे यांच्या विरोधात भोसे बिट अंमलदार म्हणून कार्यरत असलेले पो.ना. अरूण उत्तम कोळवले यांनी भादवि कलम 379,34व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1),4(क)(1)21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत करकंब पोलीस ठाण्याचे पो.स.ई मोरे,पो.हे.काँ. रानगट,पो.हे.काँ.घोळवे पो.ना. मोरे हे सहभागी झाले होते.या कारवाईत पांढ-या रंगाचा टाटा कंपनीचा 1618 माँडेल असलेला टिपर त्याचा आरटीओ क्रमांक MH 42 AF 5103 हा अंदाजे २ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *