३लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
धाराशिव साखर कारखाना लि.युनिट३ लोहा,नांदेड सन २०२०-२१च्या गळीत हंगामात ३लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगामाची सांगता समारोप करण्यात आला. कारखान्याचे कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते ऊस घेऊन आलेल्या वाहनाची व गव्हाणीची पूजा करून यशस्वी गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. धाराशिव साखर कारखान्याने २०२०-२१चा गळीत हंगाम नियोजित वेळेवर सुरू केला होता. हा गळीत यशस्वीरित्या चालवला. यावर्षीच्या हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप झाले आहे. पुढील हंगामात हि भरपूर प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने शेतकरी सभासदांनी ऊसाच्या नोंदी कारखाना कार्यस्थळावर द्याव्या असे आवाहन करण्यात आले असून कारखान्याचा यशस्वी हंगाम पार पाडणारे ऊस शेतकरी सभासद, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार यांचे चेअरमन अभिजित पाटील यांनी अभिनंदन करत आभार मानले आहे
