पंढरपूर :येथील पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा इयत्ता दहावीचा दरवर्षीप्रमाणे १०० टक्के निकाल लागला. यामध्ये आर्यन पालकर(९२.८० टक्के प्रथम), कु.कृष्णाली थोरात (८९.८० टक्के द्वितीय), तर कु. ज्ञानेश्वरी भोसले आणि कु.वैभवी कुलकर्णी (८९.०० टक्के तृतीय) यांनी यश मिळविले प्रशालेतील एकूण २० विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये, तर १७ विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणीमध्ये व ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहन परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई व संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी केले.
प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोलाची कामगिरी बजावली.