ताज्याघडामोडी

नितीन गडकरींची मोठी घोषणा; मोठ्या टोल टॅक्सपासून होणार सुटका

टोल टॅक्सपासून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे. नवीन नियमांनुसार टोल टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण यादीही जारी करण्यात आली आहे.

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्स संदर्भात मोठी घोषणा केली आहे. आता अनेक लोकांना टोल टॅक्स भरावा लागणारन नाही. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. 

टोल टॅक्स NHAI कडून वसूल केला जात आसतो. जर आपण हायवेरून चार चाकी वाहनाने प्रवास करत असाल तर, आपल्याला हा टॅक्स द्यावा लागतो. तसेच आपण दूचाकीने प्रवास करत असाल तर आपल्याकडून टोल टॅक्स घेतला जात नाही. दुचाकी वाहन खरेदी करतानाच ग्राहकांकडून रोड टॅक्स घेतला जातो. सध्या टोल टॅक्स वाहनाच्या लांबीवरून आधारीत आहे.

विशेष म्हणजे, सिंगल जर्नीसाठी टोलची किंमत वेगळी असेल. तसेच, आपल्याकडे रिटर्न टोल टॅक्सचीही व्यवस्था असते. याशिवाय, हायवेवरून सातत्याने प्रवास करणारे लोक पासच्या सुविधेचाही वापर करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *