महावितरणकडून वीज बिल वसुली साठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे डीपी बंद करणे संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित करणे चालु आहे सध्या पावसाळा असताना ही वीज पुरवठा वारंवार खंडित केल्याने जनावरांना पाणी व शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी भरणे अवघड झाले आहे ही मोहीम चालू आहे ती त्वरित बंद करावी…
मी जात नाही शेतीमालाला दर नाही मागील वर्षी कारखान्याला गेलेल्या उसाचे बिल अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे महावितरणने शेतकर्यांना आर्थिक संकट मध्ये असताना शेतीपंपाचे तोडलेले वीज कनेक्शन त्वरित जोडावे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना शेतकऱ्या समवेत आपल्या कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी दिली….
यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे पंढरपूर अभियंता गवळीसाहेब, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हासंघटक शेखर कोरके, जिल्हाउपाध्यक्ष सर्जेराव शेळके, तालुकाअध्यक्ष रमेश लंगोटे, उपाध्यक्ष रामेश्वर झांबरे, युवाउपाध्यक्ष औदुंबर सुतार,तानाजी सोनवणे, नितीन गावडे, विष्णू भोसले, दत्तात्रय काळे, दत्तात्रय भोसले मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते….
