गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१९ वर्षीय मुलगी साथीदारांच्या मदतीने सोशल मीडियातून ओळख वाढवत घालत होती गंडा

जसा सोशल मीडियाचा संर्पक साधण्यासाठी,आयुष्यातील बरे वाईट अनुभव शेअर करण्यासाठी,माहिती शेअर करण्यासाठी वापर होतो तसाच काही अपप्रवृत्ती याचा गैरवापर करून अनेकांना गंडा घालत असल्याचे वेळावेळी अनेक घटनांमधून पुढे आले आहे.असाच एक प्रकार पुन्हा उजेडात आला असून सोशल मीडियावरून जवळीक वाढवत एका १९ वर्षीय मुलीने एका बांधकाम व्यवसायिकाला आपल्या साथीदाराच्या मदतीने जाळ्यात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यवसायिकाने धाडसाने पोलिसात फिर्याद दिली आणि हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे.  उरळी कांचन परिसरातील एका व्यवसायिकाकडून 20 लाख रूपये उकळल्याचे समोर आले आहे.कोंढवा पोलिसांनी रवींद्र भगवान बदर (वय 26, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40, रा. गोकुळनगर, कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा. बाणेर, मूळ- माढा, सोलापूर), मंथन शिवाजी पवार (वय 24, रा. इंदापूर), आणि 19 वर्षीय तरुणी यांना नुकतीच अटक केली होती. 

असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी   कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून टोळीला पकडल्यानंतर व्यवसायिकाने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणीने व्यवसायिकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख केली. त्यानंतर त्यांना लोणीकाळभोर परिसरात भेटण्यास बोलविले. त्या ठिकाणी व्यवसायिकासोबत तरुणीने जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यानंतर साथीदारांना बोलवून घेतले. तक्रारदार यांना यवत पोलिस ठाण्यासमोर घेऊन गेले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 50 लाख रूपयांची खंडणीची मागणी केली. शेवटी तडजोड म्हणून 20 लाख रूपये त्यांच्याकडून घेतले. त्यानुसार 19 वर्षाच्या तरुणीसह तौसिफ शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *