Uncategorized

पंढरपूर ग्रामीण मध्ये आज पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली

गेल्या सुमारे १५ दिवसापासून पंढरपुर शहर व तालुक्यात करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या दैनंदिन चाचण्यांमध्ये शहर व तालुक्यातील नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटत गेल्याचे दिसून आले.मे महिन्याच्या मध्यास दररोज ४०० ते ५०० च्या संख्येने नवे कोरोना बाधित आढळून येत होते तर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्याही ३ हजारांच्या आसपास होती.मात्र मे महिन्याच्या शेवटच्या सप्तहात दररोज करण्यात येत असलेल्या कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्हिटी रेट घटत गेला आणि मृत्यूचा आकडाही कमी होत गेला.७ जून पासून राज्यात टप्याटप्याने अनलॉक करण्यात आले त्यामुळे पंढरपुर शहर व तालुक्यातील विविध दुकाने,व्यवसाय पुन्हा सुरु झाले.मात्र अनलॉक झाल्यानंतरही दरदिवशीच्या चाचण्यांत आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या वेगाने कमी होत गेल्याचे दिसून आल्यामळे आरोग्य व्यवस्थेनेही सुस्कारा सोडला होता.           

 जुलै महिन्याच्या सुरवातीस तर प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या तर केवळ तीनशे ते साडेतीनशे च्या आसपास राहू लागली होती.तर शहरातील नव्याने बाधितांच्या संख्येत एक अंकी वाढ नोंदवली जाऊ लागली होती.मात्र याच काळात तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र दैनंदिन कोरोना चाचण्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा चितांजनकच होता.     

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात नव्याने १०७ कोरोना बाधित आढळले असून शहरात २५ बाधितांची नव्याने नोंद झाली आहे तर प्रत्यक्षात उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनेही बऱ्याच दिवसांनी ५०० चा आकडा करत ६१४ झाला आहे.एकीकडे तिसरी लाट सुरु झाली आहे अशा वार्ता माध्यमातून प्रकशित होत असतानाच पंढरपूर शहर व तालुक्यात पुन्हा वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या निश्चित सामान्य नागिरक आणि प्रशासन यांना काळजीत टाकणारी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *