ताज्याघडामोडी

गणेश उत्सवानिमित्त 101 श्री गणेश मुर्तींचे वाटप

गेली दोन वर्ष जगावरील कोरोनाचे संकट याही वर्षी कायम असल्याने शासनाच्या वतीने गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनाच्या या नियमांचे पालन करून पंढरपुर येथील युवक नेते मा निलेश जाधव मित्र परिवार डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपुर यांच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवनिमित्त निलेश जाधव मित्र परिवाराच्या वतीने संतपेठ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर सभोवताली परिसरातील गणेश भक्तांना 101 गणेश मुर्तींचे मोफत वाटप घरोघरी करण्यात आले. यावेळी निलेश जाधव मित्र परिवारचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.

राज्यासह पंढपुरात अनेक ठिकाणी सध्या गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरु आहे मात्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सर्वसामान्य कष्टकरी कुटंबाचे अर्थकारण पूर्णतः संकटात सापडले आहे.रोजंदारीवर काम करणारे,छोटा मोठा व्यवसाय रोजगार करून उदर निर्वाह करणारे बहुतांश कुटंब सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे विविध सण साजरे करणे हे अनेक गरीब कुटूंबाना परवडणारे राहिले नाही.त्यामुळे गेल्या दीड  वर्षाच्या काळात अनेक सण साजरे न करताच दिवस आलेले दिवस पुढे ढकलण्याचे काम अनेक गरीब कुटूंबाना करावे लागले आहे.पण गणेशोत्सव हा अबाल वृद्धांसह कुटूंबातील प्रत्येकाच्या दृष्टीने श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे.अशावेळी अनेक गरीब कष्टकरी कुटूंबाना श्री गणेशाची मूर्ती घरी आणणे हे देखील आर्थिक दृष्टया कठीण होऊन बसले आहे हे ओळखूनच आपण हा उपक्रम राबिवला असल्याची माहिती यावेळी निलेश जाधव यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *