ताज्याघडामोडी

पालिका निवडणुकीत मनसेला लांब ठेवण्याचा भाजपचा निर्णय

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेसोबत युती केल्यास त्याचा फटका खास करून उत्तर प्रदेशातील निवडणुकीत बसण्याची भाजपला भीती आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत मनसेला लांब ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी मुंबई भाजपच्या महत्त्काच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार योगेश सागर व अन्य उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती करण्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली होती. मनसे व भाजपच्या नेत्यांनी पुण्यात सर्क प्रसिद्धी माध्यमांसमोर भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी भाजपच्या नेत्यांनी जाऊन भेटही घेतली होती. पण आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

मनसेसोबत युती केल्याचा फटका उत्तर प्रदेशात बसण्याची भाजप नेत्यांना भीती आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी मनसेला चार हात लांब ठेवत आरपीआय व अन्य काही छोटय़ा पक्षांना सोबत घेण्याचा निर्णय भाजप नेतृत्काने घेतल्याचे कृत्त आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर आमदार आशीष शेलार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही होकोत. त्याला सामोरे जाण्याची तयारी भाजपने केली आहे. मूळात निवडणुका या नियोजित केळेतच झाल्या पाहिजेत. कायद्यालाही ते अभिप्रेत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱयांना चारीमुंडय़ा चीत करण्याची रणनीती भाजपने आखली आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *