“एक दिन, एक घंटा, एक साथ” उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर प्रतिनिधी : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” अभियान २०२५ अंतर्गत राष्ट्र स्वच्छता अभियानाचे आयोजन एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे करण्यात आले […]
ताज्याघडामोडी
न्यु सातारा बीसीए कॉलेजमध्ये रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न.
पंढरपूर प्रतिनिधी: न्यु सातारा समूह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ बीसीए कोर्टी-पंढरपूर येथे बीसीए भाग १,२ व ३ मधील विद्यार्थ्यांकरिता पुणे येथील प्रो-अझुर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ श्री.बापू अरकस व त्यांचे सहकारी यांनी मिळून पाच दिवसाचे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ट्रेनिंग शिबीर आयोजित केले होते.सदर ट्रेनिंग हे दिनांक अठरा सप्टेंबर ते दिनांक बावीस सप्टेंबर […]
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी आ. समाधान आवताडे यांनी साधला संवाद
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांचा मदतीचा हात पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेअसून आ समाधान आवताडे यांनी आज दिनांक 24 रोजी दिवसभर खुपसंगी, लेंडवे चिंचाळे आंधळगाव,मारापूर,पंढरपूर तालुक्यातील तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, चिचुंबे, सिद्धेवाडी येथील आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या […]
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वृक्षलागवड मोहीम संपन्न
पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या […]
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची फ्लायओव्हर पाईल्स साईटला शैक्षणिक भेट
पंढरपूर (प्रतिनिधी): एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरात सुरू असलेल्या फ्लायओव्हर प्रकल्पातील फौंडेशनसाठीच्या पाईल्सच्या बांधकाम साईटला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पाईल्सच्या बांधकामासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मशिनरी प्रत्यक्ष पाहता आली. तसेच पाईल्सचे रीइन्फोर्समेंट (सळई) आणि काँक्रीटींग प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आल्या. या माध्यमातून […]
महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार मनसे नेते दिलीप धोत्रे यांना जाहीर
रविवारी पुणे येथे बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने दिलीप धोत्रे यांचा होणार सन्मान पंढरपूर : प्रतिनिधी यंदाचा महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार धोत्रेज ग्रँड उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांना नुकताच जाहीर झाला असून रविवारी पुणे येथे शिवर्पण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सिने अभिनेत्या वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते […]
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक संपन्न
उत्सव काळात गावात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस पाटलांना मार्गदर्शन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज आगामी साजरी होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा घनवट यांनी ग्रामीण भागातील पोलीस पाटलांची व ग्रामीण भागातील नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस […]
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “स्पेक्ट्रम २के२५” स्टेट लेव्हल टेक्निकल फेस्टीवल उत्साहात साजरा
पंढरपूर (प्रतिनिधी): कोर्टी तालुक्यातील पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी स्टेट लेव्हल टेक्निकल फेस्टीवल “स्पेक्ट्रम २के२५” यशस्वीपणे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमाला डिंगरे पालिमकर आणि असोसिएट्स चे सचिव श्री. संजय डिंगरे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना स्टार्ट-अप्स, […]
आपल्या स्वभावातून आपल्या भविष्याला आकार मिळत असतो -दास ऑफशोअर लिमी.चे डॉ. अशोक खाडे
स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २५’ चे उदघाटन पंढरपूरः ‘डॉ. रोंगे सरांच्या प्रत्येक शब्दातून विद्यार्थ्यांबद्दल, संस्थेबद्दल असणारी तळमळ व्यक्त होते. पंढरपूरच्या पवित्र भूमीत आणि स्वेरीच्या एका आदर्श शिक्षण संकुलात शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. स्वेरीबद्दल मला एक वेगळी आत्मीयता वाटते. आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर बऱ्याच बाबींची काळजी घ्यावी […]
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रतिबंध या विषयावर डॉ. नीरज दोडके यांचे मार्गदर्शन
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या विषयावर प्रसिद्ध फिजिशियन डॉ. नीरज दोडके यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अँटी रॅगिंग सेल, इंटरनल कम्प्लेंट कमिटी आणि रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते डॉ. […]











