पंढरपूर (प्रतिनिधी):
कोर्टी तालुक्यातील पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी स्टेट लेव्हल टेक्निकल फेस्टीवल “स्पेक्ट्रम २के२५” यशस्वीपणे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाला डिंगरे पालिमकर आणि असोसिएट्स चे सचिव श्री. संजय डिंगरे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना स्टार्ट-अप्स, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP), आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करताना आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. सर्व अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा एकूण २० वेगवेगळ्या स्पर्धा व इव्हेंट्स या कार्यक्रमात घेतल्या गेल्या.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश कुलकर्णी आणि श्रिया जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अजित करांडे यांनी स्पेक्ट्रम कमिटीच्या वतीने सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





