ताज्याघडामोडी

आपल्या स्वभावातून आपल्या भविष्याला आकार मिळत असतो -दास ऑफशोअर लिमी.चे डॉ. अशोक खाडे

स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २५’ चे उदघाटन

पंढरपूरः ‘डॉ. रोंगे सरांच्या प्रत्येक शब्दातून विद्यार्थ्यांबद्दल, संस्थेबद्दल असणारी तळमळ व्यक्त होते. पंढरपूरच्या पवित्र भूमीत आणि स्वेरीच्या एका आदर्श शिक्षण संकुलात शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. स्वेरीबद्दल मला एक वेगळी आत्मीयता वाटते. आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर बऱ्याच बाबींची काळजी घ्यावी लागते. आपल्या स्वभावातूनच आपल्या भविष्याला आकार मिळत असतो.’ असे प्रतिपादन दास ऑफशोअर लिमी., मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक खाडे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६४ व्या जयंती निमित्त ‘अभियंता दिन’ आणि ‘ऑलम्पस २ के २५’ या तांत्रिक स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दास ऑफशोअर लिमी., मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक खाडे हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित गटे हे होते. सर विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा पूजन, महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले की, ‘स्वेरी हा शिक्षणातील ब्रँड झालेला आहे. आज हजारो विद्यार्थी स्वेरीमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे नाराज होऊन परत जात आहेत. स्वेरीच्या नावातच ‘एज्युकेशन’ हा शब्द आहे. स्वेरीतील एज्युकेशन हिच स्वेरीची खरी ओळख आहे. विद्यार्थ्यांनी चार वर्ष अपार कष्ट करून पुढचे चाळीस वर्ष सुखाने आपले करिअर करावे’ असे सांगून संशोधनाचे महत्व सांगितले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना अजित गटे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी विशेष मार्गदर्शन केले.
‘ऑलम्पस २ के २५’च्या निमित्ताने देशाच्या विविध भागातील विद्यार्थी स्वेरी कॅम्पसमध्ये उपस्थित राहून विविध प्रकल्पांच्या सादरीकरणाची तयारी करत होते. या निमित्ताने स्वेरीच्या सर्व विभागांत अत्याधुनिक प्रकल्प, मशीन्स, ब्रीज, बांधकामाचे नमुने यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, स्पर्धकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाहुण्यांनी देखील विविध प्रकल्पांना भेट देवून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, सचिव डॉ.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी गुरुप्रसाद तेलकर, दत्ता घोडके, अभिजित नवले, ‘ऑलम्पस २ के २५’ चे समन्वयक प्रा. डी.टी.काशीद, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. तृप्ती चलवाड, प्रणाली नाळे, मयुरी मोरे व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर ऑलंपसच्या सह सचिवा गिरीजा देशमुख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *