ताज्याघडामोडी

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना

   पंढरपूर (दि.04) :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपर साठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर गैरप्रकार होणार नाही दक्षता घेवून दहावीची  परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परिक्षेसाठी कॉपी करणारा आणि कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.        तालुक्यात कॉपीमुक्त अभियान […]

ताज्याघडामोडी

वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या सहायाने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भरवले भव्य विज्ञान प्रदर्शन!!!!

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न केले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीप्रसाद मोहिते सरांनी केले. या प्रदर्शनामध्ये नर्सरी, जुनियर केजी व सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती हा विषय घेऊन प्रदर्शनात विविध वनस्पतींची माहिती सादर केली. […]

ताज्याघडामोडी

कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आक्रमक आ.आवताडे यांच्या मागणीची तत्काळ दखल

पंढरपूर/प्रतिनीधी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी आवर्जून उपस्थित राहून, मतदारसंघातील पाण्यासाठी या बैठकीत आक्रमक होत शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठीच मोठी तळमळ दिसुन आली. सदरची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री .अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री .ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या […]

ताज्याघडामोडी

जी बी एस साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन सज्ज : आ.समाधान आवताडे आ. आवताडे यांनी घेतली पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची बैठक

पंढरपूर Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे, पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्व्हे सुरू आहे, पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणे, मोहीम हाती घेतली जाईल, दूषित पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आ. समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपूर शहरात नुकतेच जी […]

ताज्याघडामोडी

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती

सोलापूर दि.14 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पुणे मंडळस्तरावर इयत्ता दहावीसाठी 9423042627 तर इयत्ता बारावीसाठी 7038752972 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन […]

ताज्याघडामोडी

श्री. पांडुरंग कुंभार यांना पीएच. डी.प्रदान

जिल्हा परिषद प्राथामिक शाळा सुर्ली (पुनर्वसन) केंद्र तुंगत ता. पंढरपूर येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री. पांडुरंग मच्छिंद्र कुंभार यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर याच्याकडून पीएच.डी. ही, ‘शिक्षणशास्त्र’ विषयातील पद‌वी प्रदान करण्यात आली. “सोलापूर जिल्ह‌यातील निम्न प्राथमिक स्तरावर गणित विषयाच्या अध्ययन-अध्यापनात गणितपेटीच्या परिणामकारकतेचा अभ्यास” या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांना […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ. आवताडे

प्रतिनिधी कुशल नेतृत्वाखाली दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त केली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याने तब्बल 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यासाठी प्राप्त केली आहे ही ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तुत्वाने देशातील इतर […]

ताज्याघडामोडी

बर्ड फ्लू बाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सोलापूर यांच्याकडून दक्षतेचे आवाहन प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना

बर्ड फ्लू बाबत सतर्कतेचे आवाहन सोलापूर दि.31 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व शासकीय खाजगी व परीसरातील कुक्कुट पालक तसेच पशुपालक , शेतकरी व सुजान नागरीकांना कळविण्यात येते की , आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू /एव्हिएन इन्फ्लूएन्झा (H5N1) या आजाराने कुक्कुट पक्षी व कावळ्यांमध्ये मरतुक झालेली आढळल्याने आपण ह्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या प्रक्षेत्रावरील रोजची स्वच्छता व […]

ताज्याघडामोडी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार समाधान आवताडे ॲक्शन मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचेसमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना फोडला घाम

प्रतिनिधी-जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील तसेच समग्र जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्या मागण्या पालकमंत्री ना.गोरे यांच्यासमोर उपस्थित केल्या. सदर बैठकीमध्ये आपल्या मागण्या मांडत असताना आमदार आवताडे यांनी सांगितले […]

ताज्याघडामोडी

आवताडे शुगर कडून २८०० रुपये प्रति टन याप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा – चेअरमन संजय आवताडे

प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. नंदुर. या साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ मधील ३० नोव्हेंबर पर्यंतचे उसाचे बिल २८०० रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकरी¬ ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी माध्यमांना दिली . यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे […]