वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील हल्ला अकोला शहरातील हरिहर पेठ भागात आज रविवारी सकाळी ११ वाजता दोन गटात हाणामारी सुरू आहे, अशी माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा आणि प्रवीण अहीर गटात किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान अनेकांच्या हातात लाठ्या काठ्या, […]
ताज्याघडामोडी
स्टेट बँकेच्या मॅनेजरची सायबर भामट्याकडून फसवणूक ; लावला 19 लाखाचा चुना
पुण्यातील स्टेट बँकेच्या मुख्य ट्रेझरी शाखेच्या मॅनेजरची 19 लाखाची फसवणूक सायबर भामट्याकडून करण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ या ज्वेलर्सचे डायरेक्टर किशोर कुमार शहा बोलत आहे. असे सांगून बँकेला बनावट ई-मेल पाठवत 19 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करायला सांगून मॅनेजरची फसवणूक केली आहे. पुण्यातील ट्रेझरी शाखेतील मॅनेजरलाच प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ […]
आमदाराच्या तोतया बहिणीचा पोलीस ठाण्यात गोंधळ; शिवीगाळ करत पोलिसांना धमकी
रिक्षा चालक श्रीकांत मिश्रा हा बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांची वाट पाहत होता. त्याच सुमाराला प्रीती ही रिक्षा जवळ येऊन भाडे विचारात होती. यावरून दोघांमध्ये वाद होऊन भांडण झाले. त्यावेळी पोलीस घटनास्थळी येऊन त्या महिला व रिक्षा चालक दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेने गोंधळ सुरु करून अतिशय संतप्त होऊन ती मारहाण करण्यास धावत […]
वीटभट्टीत भीषण स्फोट; ३० फूट उंचीवरुन खाली कोसळला सिमेंटचा स्लॅब, ७ ठार
बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोतिहारीयेथील नरिलगिरीमधील वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, स्फोटामुळं झालेल्या मलब्याखाली दोन डझनहून अधिक लोकं अडकले आहेत. तर, २० जण बेपत्ता आहेत. बचावकार्यासाठी घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले आहेत. वीट भट्टी सुरू करत असताना चिमणीचा स्फोट झाला. तर, चिमणीतून मोठ्याप्रमामात धूर बाहेर […]
अपत्यहीन मुलीसाठी आई-वडिलांचं भनायक कृत्य, महिलेला संपवून १० महिन्यांचं बाळ पळवलं
आसाममध्ये एका दाम्पत्याने आपल्या अपत्य नसलेल्या मुलीला बाळ देण्यासाठी एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याशिवाय त्यांच्या मुलाला आणि आणखी एकाला अटक केली आहे. आपल्या निपुत्रिक मुलीला अपत्य प्राप्त व्हावं म्हणून या दाम्पत्याने एका महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. या दाम्पत्याची मुलगी हिमाचल प्रदेशमध्ये राहते, तिला खूप दिवसांपासून मूलबाळ […]
पॅन कार्ड-आधार लिंक करण्यासाठी सरकारने दिली शेवटची तारीख, त्यानंतर पॅन होईल रद्द
जे पॅन कार्ड पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत आधार कार्डाशी जोडले जाणार नाहीं ते कार्ड रद्द समजले जाईल असा इशारा प्राप्तिकर विभागाने शनिवारी जारी केला आहे. पॅन कार्ड आधार कार्डाला जोडणे अनिवार्य आहे, ते आवश्यक आहे, त्याला उशीर करू नका, आजच लिंक करा असे आयकर विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन […]
भीषण अपघातात भाजप आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी
फॉर्च्युनर कार बाणगंगा नदीत कोसळली सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. फलटण येथे हा अपघात झाला असून या अपघातात आमदार गोरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या […]
लग्नाला मुलगी मिळत नसल्याचा घेतला गैरफायदा; एका आठवड्यात दोघांशी केलं लग्न
दोन दिवसांपूर्वी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने सोलापूरातील तरूणांनी नवरदेवाचा साज चढवून घोड्यावर बसून जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता बीडमध्ये लग्नाला मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एकाच मुलीचे एका आठवड्यात दोघांशी लग्न लावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पोलिसांनी या बनावट नातेवाईक टोळीवर गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये लग्न करून […]
जन्मदात्या पित्यानेच केला 20 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार; आईसह तिच्या मित्राचेही पित्याला सहकार्य
पीडितेवर वाघोली परिसरात असलेल्या एका सोसायटीत आणि कोंढवा परिसरात, आरोपी वडिलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वडील लैंगिक अत्याचार करत असताना, आईचा मित्र हा रोज घरी येऊन पीडित तरुणीला अश्लील बोलून तिच्याशी लगट होण्याचा प्रयत्न करत तिला मानसिक त्रास देऊ लागला होता. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पुण्यातील कोंढवा […]
नागपूर विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधारीही विविध मुद्यांवर आंदोलन करत असल्याने वातावरन तापले आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एका महिलेने स्वत:च्या अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी महिलेला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. ती सोलापूर येथील रहिवासी आहेत. अधिवेशनाचा पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या […]











