ताज्याघडामोडी

वीटभट्टीत भीषण स्फोट; ३० फूट उंचीवरुन खाली कोसळला सिमेंटचा स्लॅब, ७ ठार

बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोतिहारीयेथील नरिलगिरीमधील वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, स्फोटामुळं झालेल्या मलब्याखाली दोन डझनहून अधिक लोकं अडकले आहेत. तर, २० जण बेपत्ता आहेत. बचावकार्यासाठी घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले आहेत.

वीट भट्टी सुरू करत असताना चिमणीचा स्फोट झाला. तर, चिमणीतून मोठ्याप्रमामात धूर बाहेर येत असतानाच मोठा विस्फोट झाला आणि चिमणीवरील सिमेंटचा स्लॅब हवेत ३० ते ४० फूट उंचीवरुन खाली कोसळला. हे इतक्या कमी वेळेत घडलं की खाली बसलेल्या लोकांवरच स्लॅबचा भाग कोसळला. यात काही जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी शक्यताही निर्माण केली जात आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी जवळपास ४. ३०च्या सुमारास घडली.

दुर्घटनेतील १६ जखमींवर रक्सौलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत व जखमींना ५० हजार रुपये देण्यात येईल, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *