ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा/प्रतिनिधी  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि मतदारसंघातील रस्ते सुविधा सक्षमीकरण […]

ताज्याघडामोडी

अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.राजेश फडे यांची नियुक्ती

ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी आयोजित केलेल्या अहिंसा अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, गो मातेचा सन्मान करून त्यांना देशाच्या आर्थिक साखळीशी जोडण्याचे काम सोपविण्यात आले आहे. समाजसेवक अहिंसा साधक डॉ.राजेश रतनचंद फडे,पंढरपूर,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र यांच्याकडे अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार सोपवताना ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती

कोल्हापुरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या कुटुंबातीलच सदस्याने केल्याने एकच खळबळ उडाली. कागलमध्ये घडलेल्या या घटनेत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने बायको आणि मुलांचा खून केला आहे. हत्या केल्यानंतर महिलेचा पती स्वतःच पोलिसांत हजर झाला आणि याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच […]

ताज्याघडामोडी

लॅपटॉप ऑर्डर केला पण फ्लिपकार्टने पाठवला कपडे धुण्याचा साबण, तक्रार केल्यावर कंपनीने दिले हे उत्तर

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर एका व्यक्तीला त्या ऐवजी जे पार्सल आले त्यामुळे त्याला धक्काच बसला.यानंतर जेव्हा त्याने कंपनीकडे तक्रार केली तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला, त्याला ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत कोणतीही कारवाई करण्यास नकार देण्यात आला. यशस्वी शर्मा हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी आहे. त्यांनी फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग-बिलियन […]

ताज्याघडामोडी

ट्रॅक्टर आणि कारचा अपघात, अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे

ट्रॅक्टर सोबत झालेल्या धडकेत नेहमी समोरच्या गाडीचे नुकसान झालेले पहायला मिळते. कित्येकदा कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात नेहमी कारचा चक्काचुर झालेले दिसून येते. तिरूपती मध्ये झालेल्या एका अपघातात चक्क मर्सिडीज कारला धडकून ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले पहायला मिळाले आहे. मजबूत समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर सोबत झालेल्या या भीषण अपघातामुळे कारच्या सुरक्षाविषयक फिचर्सबाबत सोशल मीडियावरील चर्चांना उधान आले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बुरखा घालण्यास मनाई केल्याने इकबालने केली रुपालीची हत्या!

बुरखा घातला नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. इकबाल अहमद शेख (वय 36), असे आरोपीचे नाव असून तो टॅक्सीचालक होता. हिंदू तरूणीने 3 वर्षांपूर्वी एका मुस्लिम तरूणाशी विवाह केला होता. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्यामुळे त्यांच्या प्रेमात धर्म आडवा येणार नाही, हे लग्नाच्या वेळीच ठरले होते. मुलगी हिंदू […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २के२२’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा समारोप

शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले पाहिजे -माजी विद्यार्थी धनुर्धर अर्जुनदास ‘आपण आध्यात्मिकते सोबतच  लॉजीकली विचार केला पाहिजे कारण शिक्षण आणि संस्कृती या दोन्ही बाबींचा समन्वय असला   पाहिजे. यासाठी केवळ अंगी असलेली कौशल्ये पुरेशी नाहीत, तर त्यांची  कृतीतून अंमलबजावणी झाली पाहिजे त्यामुळे शिक्षण आणि संस्कृतीचे महत्व अधिक वाढते आणि विकास होण्यास सुरवात होते त्यामुळे  शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक

सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील भोंदू मांत्रिकाच्या घरात घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध, समुळ […]

ताज्याघडामोडी

या आहेत नव्या विकास आराखड्यावरील 34 महत्वपूर्ण हरकती व सूचना

वारकरी संप्रदाय पाईक संघाने दाखल केल्या ३४ सूचना व हरकती    १)उद्धव घाट ते विप्रदत्त घाट असा पाठीमागील बाजुने ‘पाईक सेतू ‘ हा खास दिंड्यांसाठी प्रदक्षणा पुल तयार करुन तांबडा मारुती ते कालिका देवी चौक या रोडवरील सर्व दिंड्या रथ या पुलावरुन नेल्यास एकादशी दिवशीहोणारी महाद्वार घाट व चौक परिसरातील ५०% गर्दी कमी होईल २) […]

ताज्याघडामोडी

अनैतिक संबंधातून डाॅक्टर पतीला टोचले भुलीचे इंजेक्शन; पत्नी विरोधात गुन्हा दाखल

दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डाॅक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या म्हसरूळ येथील एका हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात […]