नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. काही रुग्णांना दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जर कुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. […]
ताज्याघडामोडी
पंढरपूरातील 15 खाजगी रुग्णांलयातील 540 बिलांची तपासणी 7 लाख 3 हजार 700 रुपये केले कमी
पंढरपूर(18):- कोरोना बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब व गरजू रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावेतयासाठी शासनाने उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे. अद्यापही काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा आधिक दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षण पथकामार्फत शहरातील 15 खाजगी रुग्णांलयातील 540 बिलांची तपासणी करुन 7 लाख 3 […]
विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात
सोलापूर, दि. 18 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे […]
धक्कादायक! पेन्शनचे दोन लाख मागितल्याने बापाने केला पोटच्या मुलाचा खून
सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाखांची मागणी करणाऱ्या मुलास जन्मदात्या बापाने डोक्यात लोखंडी पाइपचा घाव घालून ठार केले. ही घटना रविवारी (दि. १६) सायंकाळी सटाणा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. हितेश कृष्णा बाविस्कर (३४) असे मृताचे नाव असून छावणी पोलिसांनी बापासह इतर दोघांना अटक केली आहे. संशयित पिता कृष्णा पौलद बाविस्कर हा एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. […]
कोरोना लसींचा तुटवडा संपणार, केंद्र सरकार आणखी 5 लसींना मंजुरी देण्याची शक्यता
नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतात सध्या दररोज दोन ते तीन लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. काही राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. देशात सध्या कोरोनाबाधित संख्या नियंत्रणात येत असली तरी रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी भारत सरकारननं सध्या तीन लसींच्या वापराला […]
आमदार प्रताप सरनाईकांच्या शोधासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड
पुणे: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) याप्रकरणात लोणावळा येथील एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. काहीवेळापूर्वीच ED आणि CBI चे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून याठिकाणी सध्या शोधसत्र सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि […]
बाप रे! मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं अन्…
नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांच्या मनात एक प्रकारची धडकी भरवली आहे. त्यामुळे करोनापासून वाचण्यासाठी लोक ऐकीव गोष्टीवर जास्त विश्वास ठेवत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका व्यक्तीने कोरोना झाल्याच्या भीतीने रॉकेल प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यात आली, ती निगेटिव्ह होती. या व्यक्तीला […]
न.पा.स्थायी समितीची आजच्या ऑनलाईन बैठकीबाबत नाराजी
पंढरपुर नगर पालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून १० सदस्य असलेल्या या समितीची ऑनलाईन बैठक आयोजित केल्यामुळे अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चेस वाव मिळणार नाही अशी नाराजी काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे.बार्शी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा थेट सभागृहात नुकतीच पार पडली मग आपल्याकडे केवळ १० सदस्य असलेल्या स्थायी समिती […]
कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवली, AIIMS आणि ICMR यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी
मुंबई : कोविड -19च्या उपचारासाठीच्या मार्गदर्शकतत्त्वे सरकारने सोमवारी बदलली आहेत. कोरोनाच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांमधून रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर काढून टाकण्यात आला आहे. कोविड रुग्णांच्या उपचारामध्ये, गंभीर आजार दूर करण्यात आणि मृत्यूची घटना कमी करण्यात प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरली नाही, हे अभ्यास केल्यावर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यापुढे प्लाझ्मा थेरपी उपयोग करु नये, असे […]
महाराष्ट्राला मोठा दिलासा! राज्यात आज 26,616 नवे रुग्ण, मृतांची संख्याही घटली
मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं लॉकडाऊनही 1 जूनपर्यंत वाढवलाय. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. राज्यात दररोज 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून, आज राज्यात फक्त 26,616 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणांचं प्रमाण कमी […]











