शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारला पाय उतार व्हावे लागले होते. यामुळे शिसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडे असलेली पक्षाची संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका […]
ताज्याघडामोडी
जोडप्याचं टोकाचं पाऊल, दीड वर्षांचा चिमुकला दोन दिवस शेजारीच बसून; तिसरा दिवस उजाडला अन्..
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये दीड वर्षांचा मुलगी तीन दिवस त्याच्या आई वडिलांच्या मृतदेहांसोबत बंद घरात राहत होता. तहान भुकेनं व्याकूळ झालेला चिमुरडा बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याच्या रडण्याचा आवाजदेखील शेजाऱ्यांना ऐकू गेला नाही. मृतदेह कुजू लागल्यानं दुर्गंधी पसरु लागली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यांनी दार तोडलं. तेव्हा आत जोडप्याचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसले आणि निष्पाप चिमुकला […]
भारतीय रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांना झटका, आता तिकिटांवर मिळणार नाही हा लाभ
ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात सवलत बहाल करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसला आहे. कारण आता त्यांना रेल्वे तिकिटावरील सवलतीचा लाभ मिळणार नाही. न्यायमूर्ती एसके कौल आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने एमके बालकृष्णन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यात रोगाचा प्रसार रोखण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सवलती पुनर्संचयित कराव्यात, […]
लग्नाला ५ दिवस, घरात लगीनघाई, अंगणात मांडव; तो दुसऱ्यावर अक्षता टाकायला गेला अन् अघटित घडलं
एका तरुणाचं लग्न अवघ्या ५ दिवसांवर होतं. घरात सर्व तयारी झाली होती, अंगणात मांडव पडला होता. पण, तेवढ्यात घरी अशी बातमी आली की आनंदाचं रुपांतर शोकात झालं. ५ दिवसांनंतर बोहल्यावर चढणारा हा तरुण गावातील एकाच्या लग्नाला गेला होता. तेथून घरी परतत असताना अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला मारहाण केली आणि गळा आवळून त्याचा खून केला. […]
लग्नाच्या १८ वर्षानंतर नवऱ्याला समजलं पत्नीचं धक्कादायक सत्य, हसता खेळता संसार एका क्षणात मोडला
१८ वर्षांचा संसार, दोन मुलं पती-पत्नी दोघांचही एकमेकांवर जीवापाड प्रेम सर्व सुरळीत सुरू असताना अचानक नवऱ्याला बायकोचं एक सत्य समजलं अन् इतक्या वर्षांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. बायकोचं सत्य समजल्यावर पती नैराश्यात गेला आहे. तर त्याने घरदेखील सोडले आहे. २० वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी […]
मी लग्न करेल, माझ्या बरोबर चल, माझ्यासोबत प्रेमसंबध ठेव, नकार देताच तरुणीवर सपासप वार
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील अकोट शहरात घडली. तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्याबरोबर ये, असा प्रस्ताव आरोपी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला दिला. पण तिने नकार देताच धारदार चाकूने तरुणीच्या मानेवर अन् शरीरावर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणी रक्तबंबाळ […]
झोपेत असलेल्या वहिनीचा खून केला, पळून जाताना अपघातात दीराचाही मृत्यू
शिरुर तालुक्यातील आंबळे गावात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरूणाने आपल्या सावत्र भाऊ आणि वहिनीवर हल्ला केला असून या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला आहे तर वहिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून जाताना खुन करणाऱ्या तरूणाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रियंका सुनील […]
तरुणीचा बोलण्यास नकार, संतप्त तरुणाचं संतापजनक कृत्य; वाचून तुम्हीही डोक्याला हात माराल
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या इमारतीच्या पार्किंदमध्ये जाऊन दुचाकीसह तीन दुचाकी पेटवल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली आहे. या प्रकरणी एका युवकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी युवकाच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लोहगावमधील तरुणीच्या वडिलांनी विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली, पुणे) आणि […]
मुलगा हवा म्हणून प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; पत्नी म्हणते, मला मान्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एका विभागातील प्राध्यापकाने विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केला असून यामध्ये त्याची पत्नीही सहभागी होती. पीडित विद्यार्थीनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री दहा वाजता प्राध्यापक डॉक्टर अशोक गुरापा बंडगरसह पत्नी पल्लवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठातील एका विभागात शिक्षण […]
नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी […]











