आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनेच आपल्या पतीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला. आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन घेणाऱ्या पत्नीनंच पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही खळबळजनक घटना मालेगावच्या टाकळी गावात समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावून […]
ताज्याघडामोडी
भावाने मोबाईलमधून सिमकार्ड काढल्याच्या वादातून बहिणीची आत्महत्या
लहान बहिण घरातील काम सोडून सतत मोबाईल बघत असल्याने मोठ्या भावाने बहिणीच्या मोबाईलमधून सीमकार्ड काढल्याच्या वादातून बहिणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात घडली. किरण शिवदास साहनी (१८) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृत किरण […]
शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय. शरद पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका […]
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते. मात्र, त्यांच्या हा दौरा काही कारणामुळे स्थगित करण्यात आलाय. याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्यांचा हा अयोध्या दौरा स्थगित […]
स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्तांकडून 50 कोटींचा अपहार
पुण्यातील वकीलाने केली पोलिसात तक्रार त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्त, अध्यक्ष, संचालक व सदस्यांनी भाविकांच्या तब्बल 50 काेटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा धक्कादायक आराेप पुणे येथील एका वकीलाने केला आहे. या संदर्भात जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वकीलनाने न्यायालयासह, ईडी व सीबीआयकडे पाठपुरावा करणार असल्याचे […]
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार
सोलापूर जिल्हयात आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च प्रा.लि. पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची महिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी दिली. अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोफेशनल ट्रेनींग प्रोग्रॅम अंतर्गत याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये फार्मा मॅनेजमेंट डिप्लोमा, जॉब संदर्भातील सल्ले, फार्मा स्किल डेव्हलपमेंट, वेबिनार, चांगल्या फार्मा कंपनीमध्ये प्लेसमेंट असे अनेक प्रोग्रॅम व कोर्स वर्क घेणार असल्यामुळे विद्यार्थ्याचे करिअर उत्तम होणार असल्याचे फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले. विद्यार्थ्यां मध्ये कुशल निर्णय क्षमता व नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी व भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे असे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे डायरेक्टर डॉ.महेश बुरांडे म्हणाले. यावेळी त्यांचे सहकारी श्री. समीर बुरांडे मुख्यकार्यकारी अधिकारी (आयपीईआर) पुणे, श्री. संदीप भानुशाली मार्केटिंग कन्सल्टन्ट पुणे व श्री. बी आर मासाळ माजी जॉईंट कमिश्नर एफडीए आदी उपस्थित होते. हा सामंजस्य करार संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नवरा वयाने दुप्पट मोठा म्हणून आईने 15 दिवसांच्या बाळाला सोडले फुटपाथवर, पण…
नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीने एका आईने15 वर्षाच्या मुलाला फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून या बाळाच्या आईचा शोध लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेच्या हद्दीत चौपाटीवर बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती साधारण १५ दिवसांच्या […]
हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड…वाहतुकीचे नवीन नियम पाहिले का?
हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून 2 हजार रुपयांचं असेल. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्याचे सुधारित नियम अधिसूचित केले आहेत. मंत्रालयाच्या नियमांनुसार, देशात फक्त दुचाकींसाठी बीआयएस-प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि […]
महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची भरती
राज्याच्या पोलीस दलात काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बादमी आहे. राज्य सरकार लवकरच गृहविभागातर्फे पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी वेळी तब्बल 7 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. राज्यात अनेक तरुण पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. त्या सर्वच तरुणांसाठी हे […]
अखेर ठरलं, राज ठाकरेंची पुण्यातील सभा २२ तारखेला होणार!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण, राज ठाकरेंची सभा पुण्यात होणारच असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यात येत्या २२ तारखेला ही सभा होणार अशी माहिती मनसेनं दिली आहे. मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष […]











