गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हळंदे टोळीविरूद्ध मोक्का, पोलीस आयुक्तांकडून 27वी कारवाई

पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत दर्शन युवराज हळंदे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्कानुसार करण्यात आलेली ही 27वी कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दर्शन युवराज हळंदे (वय 21, रा. अपर बिबवेवाडी ) आणि रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय 18, रा. कात्रज -कोढवा रस्ता) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जमावाच्या मारहाणीत वायरमनचा मृत्यू

भडगाव येथील महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण करणार्‍यांना थांबवण्यासाठी गेलेल्या वायरमन गजानन राणे यांचा मृत्‍यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथे काल (सोमवार) शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांचे कृषीपंप वीज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी भडगाव उपविभागातील शहर, […]

ताज्याघडामोडी

जैन समाजाची एकता ही काळाची गरज

सकल जैन समाज,नगर रोड वडगाव शेरी, पुणे येथे जैन समाजातील युवकांच्यावतीने आयोजित निषेध सभेमध्ये बोलताना फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा म्हणाले की, जैन समाजाला एकीची अत्यंत गरज असून भविष्यामध्ये जर समाजामध्ये एकी राहिली नाही तर समाजाचे मोठे नुकसान होणार आहे . बराच काळापासून अनूप मंडलकडून दिशाभूल करणार्‍या पोस्टद्वारे जैन समाजाविरूद्ध चुकीची माहिती पसरवली जात आहे. […]

ताज्याघडामोडी

सावधान! केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; 5 लाखांचा दंड, 1 वर्षाची कैद…जाणून घ्या…

देशभरात करोडो हेल्मेट ही दुय्यम दर्जाची किंवा बनावट आहेत. या बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. जर हे बेकायदेशीर म्हणजेच ISI (आयएसआय) मार्क असलेले हेम्लेट विकत असेल किंवा घेत असेल तर त्या दोघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि […]

ताज्याघडामोडी

मोदींची मोठी घोषणा! 18 वर्षावरील सर्वांचं 21 जूनपासून मोफत लसीकरण करणार, केंद्र सरकार सर्व खर्च उचलणार

नवी दिल्ली: भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, […]

ताज्याघडामोडी

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, 7 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी (7 जून) देशवासियांशी संवाद साधला. देशात 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधानांनी केली. तसंच कोरोनाची दुसरी लाट अद्यापही गेलेली नाही. कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न […]

ताज्याघडामोडी

कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज?

मुंबई : आजवर 22 कोटी जनतेचं देशभरात लसीकरण झालंय. पण लस कुठली घ्यावी, याबद्दल अजूनही तुमचा निर्णय झाला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे.. कुठल्या लसीमुळे जास्त आणि लवकर अँटिबॉडीज तयार होतात, याबद्दल नुकतंच एक संशोधन झालंय. पाहुया त्याचं उत्तर काय आहे. जगात सगळ्यात लसींसंदर्भात अभ्यास सुरू आहे. भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तुफान राडा, महिला ग्रामसेविका आणि सदस्यांमध्ये भर रस्त्यावर हाणामारी

भंडारा, 07 जून: भंडारा जिल्ह्यातील सिलेगाव येथे महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. महिला सदस्यांनी महिला ग्रामसेविकेला मारहाण केली. घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुन महिला सदस्यासह महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घाडगे वस्ती जबरी चोरीतील आरोपीना अटक,तीनही आरोपी पंढरपुरातील

गत महिन्यात १८ मे रोजी तुंगत भोसले वस्ती येथील रहिवाशी योगेश दादासाहेब जाधव (वय वर्षे ३४ ) हे मोटारसायकल वरून पंढरपूर कडून तुंगतकडे जात असताना देगाव हद्दीतील घाडगे वस्ती येथे पाठीमागून बजाज पल्सर दुचाकी वरून आलेल्या तिघाजणांनी मोटार सायकल आडवी लावून योगेश जाधव यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मारहाण करून त्यांच्या जवळील ५० हजार रुपये […]

ताज्याघडामोडी

भाजपा मीडिया सेल सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई

भाजपा मीडिया सेलचा सोलापूर जिल्ह्ध्यक्ष सागर लेंगरे याच्या मालकीच्या हॉटेल सागरवर मोहोळ पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईत वाहनासह १४ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.          गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची अवैध दारू विक्री उजेडात आणली आहे.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी […]