ताज्याघडामोडी

10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान – धनंजय मुंडे

मुंबई : 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री […]

ताज्याघडामोडी

घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका; मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई – दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात घेता पुढील काळात जास्तीचे ऑक्‍सिजन व आयसीयू बेड्‌स लागतील. याशिवाय फिल्ड रुग्णालयासारख्या सुविधा उभाराव्या लागतील. याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंनी केली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंनी केली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी पंढरपूर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पक्षाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे हे नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याबरोबरच सर्वसामान्य अडचणीत असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी २ लाख ३३ हजार लाचेची मागणी

सांगली : जत तालुक्यातील परागंदा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने म्हेत्रेला अटक केली. म्हेत्रेच्या सांगण्यावरुन लाच घेताना दोन दिवसांपूर्वी माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रात्री लाच लुचपत विभागाने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर तहसीलदारांची वाळू साठ्यावर कारवाई

पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने ताब्यात घेत वाळू उपसा प्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत. तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

थरार ! भर बाजारातच पतीचे पत्नीवर चाकूने सपासप वार

पती-पत्नीतील वाद विकापाला गेले की नको त्या घटना घडतात. जळगावमध्ये देखील पती-पत्नी वाद झाले आणि या वादात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिचा पती सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव) याने चाकूने सपासप वार करत खून केला.या घटनेत पूजाचा भाऊ शंकर भिका चव्हाण (वय […]

ताज्याघडामोडी

आशा स्वयंसेविकांचा संप मागे; १ जुलैपासून पगारात वाढ

राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप […]

ताज्याघडामोडी

पोटनिवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून भाजप तसेच ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तर भाजपने आंदोलनही करण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही परीस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा व त्यानंतर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणूक घ्याव्यात, अशी मागणीही केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदनही दिले. त्यानंतर राज्य सरकारची राज्यमंत्री मंडळाची […]

ताज्याघडामोडी

चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीच्यावतीने मिशन ऑक्सिजन मोहिमेचा शुभारंभ

चंदूकाका सराफ सुवर्ण पेढीच्यावतीने मिशन ऑक्सिजन मोहिमेचा शुभारंभ पुणे – सध्या जगात आणि भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. मागील वर्षी या महामारीच जे रूप होत ते यावर्षी बदललेलंही आपण पाहिलं. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या पुढे मागल्या वर्षी वेगळे प्रश्न होते आणि आज वेगळे प्रश्न आहेत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेचा. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाच हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : तक्रारदाराची त्याच्या सोसायटीतील रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला ताब्यात घेतले आहे. पूनमसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (५७, रा. बेदवाडी, परसोडा, ता.वैजापूर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो पंढरपूर सज्जा येथे कार्यरत आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी वळदगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. तक्रारदाराने सातारा परिसरात रो-हाऊस खरेदी […]