पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आमने सामने आले असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा आणि निलेश सांबरे गटात मोठा मोठा राडा झाला असून यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली आहे. […]
ताज्याघडामोडी
इनरव्हील क्लब, पंढरपूरच्या नूतन अधाक्षापदी सौ.उज्वला उमेश विरधे यांची निवड
विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी विश्वव्यापी इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूरच्या नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा पंढरपूर येथील कर्मयोगी सभागृह येथे नुकताच पार पडला. यामध्ये पुढील वर्षासाठी अध्यक्ष म्हणून प्राध्यापिका सौ.उज्वला उमेश विरधे यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार सौ.सीमाताई प्रशांत परिचारक व पिडीसी नगीना बोहरी यांचे हस्ते संपन्न झाला. जागतिक महिला सबलीकरण हे जागतिक इनरव्हील […]
महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, राजेश टोपेंनी दिली दिलासादायक बातमी!
कोरोनाच्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातले होते. पण आता राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही’ अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यावर समोरील मोठे संकट तुर्तास टळले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात […]
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही, वृत्त निराधार: शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं. स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. […]
साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना सरकारी वकीलास अटक
राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील देवेंद्र मधुकर सोन्निस (वय ५७ रा. पुणे) यांना साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ महिन्यापासून सरकारी वकील म्हणून देवेंद्र मधुकर सोन्निस हे काम पाहत […]
पुरातत्व विभागाने 31 जुलैपर्यंत आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश
पुरातत्व विभागाने 31 जुलैपर्यंत आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश पंढरपूर, दि.14 : लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन आराखडा (डिपीआर) तयार करण्यात येणार आहे. तो आराखडा मंदीर समितीकडे 31 जुलै पर्यंत सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. […]
उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
शिवसेना पक्षप्रमुखपदासोबत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. याची पोचपावती जनतेनेच दिली आहे. प्रश्नमने 13 राज्यात केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. प्रश्नमने आपल्या या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत 13 राज्यांची निवड केली होती. ज्यात बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, […]
विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करण्याऱ्या विकृत लिपीकाची धिंड
गुण वाढविण्याचे आमिष दाखवत बारावीतील विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करण्याऱ्या विकृत लिपीकाला मुलीच्या कुटूंबियांनी काळे फासत धिंड काढली. त्याला चोप देत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अभिजित पवार (वय 34, रा. वडगाव बुद्रुक) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अभिजित पवार लिपीक आहे. संबंधित महाविद्यालयात […]
एमएस-सीआयटी परीक्षेत आयआयटी मधील दोन सख्या बहिणी महाराष्ट्रात प्रथम
पंढरपूर: पंढरपूर शहरातील आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील तसमिया अतिक मुल्ला, अस्मिया अतिक मुल्ला व आकाश लोखंडे यांनी एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहे. मार्च 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी त्यांचा […]
सरपंच पती आणि उपसरपंचाचा नंग्या तलवारी घेऊन बाभळगावात गोंधळ
इंदापूर तालुक्यातील बाभळगाव येथे गावातील मोकयाच्या असलेल्या दुकानगाळ्या चा वाद शिगेला पोहोचला असून या वादामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वादात थेट सरपंच पती व उपसरपंच यांच्यासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हरायल झाला आहे. गावातीलमोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणत आरोपीने […]











