

इंदापूर तालुक्यातील बाभळगाव येथे गावातील मोकयाच्या असलेल्या दुकानगाळ्या चा वाद शिगेला पोहोचला असून या वादामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वादात थेट सरपंच पती व उपसरपंच यांच्यासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हरायल झाला आहे.
गावातीलमोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणत आरोपीने फिर्यादी दत्तात्रेय उंबरे यांना धमकावले. मात्र गाळे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादी उंबरे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे समजते.या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आरोपी तलवारी हातात घेत गावात दहशत माजवताना दिसत आहेत.