महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहीर लाभसाठी लादलेली दोन विहीरमधील ५०० फूट अंतराची अट रद्द करावी या अनुषंगाने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान आवताडे यांनी रोजगार हमी मंत्री संदीपानराव भुमरे यांच्याशी पत्रव्यवहार करून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलसिंचन सुविधेच्या माध्यमातून हरितक्रांती घडून यावी म्हणून शासनाच्या वतीने सदर […]
ताज्याघडामोडी
संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साधेपणाने साजरा करणार – नामदास
पंढरपूर, प्रतिनिधी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 671 वा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार दि. 6 ऑगस्ट रोजी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास यांनी दिली. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीसंत […]
सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून तरूणीची आत्महत्या, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
पुण्यात दोन व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर बदनामी केली आहे. या बदनामीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे. दिपाली गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन गायकवाड आणि रिया चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गायकवाड आणि त्याची मैत्रीण रिया यांची दीपालीसोबत मैत्री होती. दोघांनी विविध कारणांमुळे संगनमत करुन […]
पतीचे कोरोनामुळे निधन,पत्नीकडून विम्याचे १ कोटी रुपये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दान
दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणून संतांनी ज्या विठ्ठलाचा आपल्या अभंगातून उल्लेख केला आहे.पण या सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी आता संपूर्ण महाराष्ट्राला शतकानुशतके लागून राहिली आहे.आधी प्रपंच करावा नेटका असे संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सांगितले आणि आपला प्रपंच करत असताना विठ्ठलाच्या नमस्कारणाची महतीही वर्णन केली आहे.भाविक आपल्या कुटूंबाच्या पालन पोषणासाठी राबत असताना आपण जे कमवतो त्यातील काही […]
श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या 81 व्या वर्षी बुधवारी सायंकाळी पाच वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भावर तसेच श्री भक्तांवर शोककळा पसरली आहे. गत तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर घरीच वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. त्यांना […]
केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण संदर्भात महत्वाचे विधेयक मंजूर -संभाजीराजे छत्रपती
राज्य आणि केंद्रात मराठा आरक्षणावरुन सातत्याने टोलवाटोलवी सुरु आहे. अशा परिस्थिती आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबतचा महत्वाचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला. याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची […]
वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत
वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत पंढरपूर: धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा १ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत पाटील यांची सामाजिक कार्याची आवड व सामाजिक […]
बळीराजाचा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ जयश्रीताई संतोष बोरा यांची निवड…!!!
बळीराजाचा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ जयश्रीताई संतोष बोरा यांची निवड…!!! माढा तालुक्यातील पदाधिकारी बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ.जयश्रीताई संतोष बोरा(बार्शी) यांची निवड करण्यात आली…. बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल व जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली…. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर […]
काल रात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक ,आज आदेश निघाला -शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे
अकलूज हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिदू राहिलेले शहर.या शहराच्या सर्वागीण विकासासाठी अकलूज-माळेवाडी साठी अकलूज नगर पालिकेची स्थापना करण्यात यावी ,या नातेपुते नगर पंचायत स्थापन स्थापन करण्यात यावी यासाठी गेल्या जवळपास ४३ दिवसापासून अकलूजकरांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.मात्र या बाबत शासनस्तरावर निर्णय होत नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अकलूज […]
पत्नीचा छळ करणाऱ्या ‘त्या’ व्यवसायिका विरोधात पोलिसांची कारवाई
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड पिता-पुत्रांवर […]











